लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय, लोकलवरही निर्बंध येण्याची शक्यता – आरोग्यमंत्र्यांचे मोठे विधान

लॉकडाऊन हा शेवटचाच पर्याय असतो(lockdown is the last option) त्यामुळे याबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे(rajesh tope) यांनी स्पष्ट केले आहे.

    मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत चालला आहे. जगातील १० कोरोनाप्रभावित देशांनंतर थेट महाराष्ट्र राज्याचा क्रमांक येत असल्यामुळे ठाकरे सरकारची चिंता वाढली आहे. एकंदरीत, ही सर्व परिस्थिती पाहता राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने जात असल्याचे संकेत मिळत आहे.

    दरम्यान, लॉकडाऊन हा शेवटचाच पर्याय असतो त्यामुळे याबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

    राज्यात लॉकडाऊन लावायचा की नाही, हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असून मुख्यमंत्री याबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेतील, असे टोपे यांनी स्पष्ट केले.  ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनाच लॉकडाऊनचा अधिकार असतो. महाराष्ट्राच्या आरोग्याच्या हिताचा तसंच इतर परिणामांचा विचार करुन ते आणि इतर वरिष्ठ मंडळी चर्चा करतील आणि ठरवतील. लॉकडाऊन हा  शेवटचाच पर्याय असल्याने याबबत सविस्तर चर्चा करुनच निर्णय घेतला जाईल, असे टोपे यांनी सांगितलं.

    लोकल बंद होणार का?

    लोकलविषयी ते म्हणाले की, लोकलबाबत कठोर निर्णय घ्यावे लागतील. सुरेश काकाणी यांनी चर्चा करुन पत्र काढलं आहे. ज्यामध्ये त्यांनी लोकांनी योग्य प्रतिसाद दिला नाही तर रेल्वेच्या बाबतीत योग्य ते विचार करावा लागेल असं सांगितलं आहे. त्यामुळे मुंबई पालिका आयुक्त मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन योग्य निर्णय घेतील.