गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत पण..

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येची केस सीबीआयकडे सोपवण्यात यावा, असा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने दिला.राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून सीबीआयला राज्य सरकार पूर्णपणे सहकार्य करेल, अशी माहिती प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली.  यावेळी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना अनिल देशमुख यांनी सांगितले की, ‘सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंह राजपूतची केस सीबीआयकडे सुपूर्द केली या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.मात्र विरोधी पक्षातील नेते  बिहारमधील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.  सुप्रीम कोर्टाने मुंबई पोलिसांच्या तपासात  कोणतीही त्रुटी काढली नाही. तसेच मुंबई पोलिसांच्या तपासात कोणाताही दोष नव्हता. मुंबई पोलिसांनी योग्य तपास केला ही अभिमानाची बाब आहे.  

 

बिहारमधील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा मुंबई पोलिसांनी योग्य तपास केला आहे. याबाबत सुप्रीम कोर्टानेही काही दोष काढला नाही,  मात्र  बिहारमधील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील नेते या प्रकरणात  राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. दरम्यान राज्य सरकार न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देणं त्यांनी टाळलं.