डोंबिवलीमध्ये घरगुती सिलिंडर लिक झाल्याने उडाला आगीचा भडका

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील सारस्वत कॉलनी येथील न्यू अमित सोसायटीतील तिसऱ्या मजल्यावरील एक किचनमधील गॅस सिलिंडर लिक झाल्यामुळे आगीचा भडका उडाला. या घटनेत अग्निशमनच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली. घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी विभागात भीती पसरली होती.

याबाबत अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी ३:४५ वाजता आगीची माहिती मिळाली. ताबडतोब अग्निशमन जवान घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळविले. घरातील गॅस लिक झाल्यामुळे आग लागली असे प्रथम दर्शनी दिसत आहे. आगीत किचन मधील सर्व सामान बेचिराख झाले  सले तरी मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुमारे एक तासाचा कालावधी लागला.