भिवंडीच्या सेतू कार्यालयामध्ये दाखले मिळविण्यासाठी लगबग

भिवंडी: कोरोना संसर्गकाळात रेंगाळलेल्या दहावी बारावी प्रमाणपत्र परीक्षांचे निकाल जुलै महिन्यात जाहीर झाले. त्यानंतर सर्वांचीच लगबग सुरू होते ती पुढील शैक्षणिक प्रवेश घेण्याची. मात्र त्यासाठी लागणारा उत्पनाचा दाखला , रहिवाशी दाखला, जात प्रमाणपत्र हे आवश्यक असल्याने आठवड्याचा पहिला दिवस असल्याने व तहसीलदार कार्यालयात कर्मचारी उपस्थिती बऱ्यापैकी असल्याने भिवंडी तहसीलदार कार्यालय परिसरातील सेतू कार्यालयात विद्यार्थ्यांसह पालकांनी मोठी गर्दी केली होती.

कोरोना संसर्गाची भीती असल्याने सर्वत्र सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे या कार्यालयाने सुध्दा कार्यालयाच्या खिडकीतून व्यवहार सुरू केले आहेत. मात्र त्या प्रत्येक खिडकीवर दाखले काढण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी एकच गर्दी दिसून येत आहे.