dandavat yatra by husband

बायकोच्या त्रासाने पीडित असलेल्या एका नवऱ्याने दंडवत यात्रा काढून न्यायाचं साकडं (dandavat yatra for justice by husband) घातल्याची घटना हरयाणामधील हिसार येथे घडली आहे.  राकेश कुमार या पीडित नवऱ्याने बायको आणि सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून केलेलं कृत्य पाहून सगळेच थक्क झाले.

हिसार : लग्नानंतर महिलांचा छळ होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र काही ठिकाणी बायकोच्या त्रासाला कंटाळून नवऱ्याने पोलिसांकडे तक्रार केल्याच्या घटना घडत आहेत. बायकोच्या त्रासाने पीडित असलेल्या एका नवऱ्याने दंडवत यात्रा काढून न्यायाचं साकडं (dandavat yatra for justice by husband) घातल्याची घटना हरयाणामधील हिसार येथे घडली आहे.

राकेश कुमार या पीडित नवऱ्याने बायको आणि सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून केलेलं कृत्य पाहून सगळेच थक्क झाले. न्याय मिळवण्याच्या मागणीसाठी त्या नवऱ्याने पोलीस स्टेशन ते एसपी ऑफिसपर्यंत ८०० मीटर दंडवत यात्रा काढली. ही यात्रा पूर्ण झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

राकेश कुमार हा हिस्सारमधील खैरपूर कॉलनीमध्ये राहतो. पोलीस आणि सासरची मंडळी ११ वर्षांचं वैवाहिक आयुष्य नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, ही तक्रार राकेशने केली आहे. राकेशने आपल्या तक्रारीचे पत्र हिसार विभागाचे आयजी, हरयणाचे गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांच्याकडेही दिले आहे. आपल्या मेव्हणीच्या ओळखीचा विनोद नावाचा व्यक्ती बायकोला त्रास देत असल्याचा दावाही राकेशने केला आहे.

कपिल नावाचा एक व्यक्ती  ब्लॅकमेल करत होता. मी त्याच्याविरोधात कारवाई करण्याचा प्रयत्न केला तेव्हा बायको आणि सासरच्या मंडळींनी माझ्यावर हुंडा आणि छळाची केस दाखल केली आहे. या प्रकरणानंतर बायको आणि मुलं तिच्या माहेरी राहत आहेत, असेही राकेशने सांगितले.

राकेश यांनी असा आरोप केला आहे की, सासरच्या मंडळींनी केलेल्या तक्रारीनंतर खैरपूर पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेऊन मारहाण केली. त्याचबरोबर माझी तब्येत बिघडली तरी पोलिसांनी कोणतेही उपचार केले नसल्याचा राकेशचा दावा आहे. न्याय मिळावा यासाठीच ही दंडवत यात्रा काढली. गरज पड़ली तर सर्वोच्च न्यायालयात इच्छा मृत्यूची याचिका दाखल करेन, असेही राकेशने म्हटले आहे.

दरम्यान, राकेशचे सगळे आरोप पोलिसांनी फेटाळले आहेत. या प्रकरणात तपास सुरु असल्याचं स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.