कोणी विरोध केल्यास रिपब्लिकन पक्ष करणार कंगनाचे संरक्षण – आठवले

मुंबई: लोकशाहीत प्रत्येकाला टीका टिप्पणी करण्याचा अधिकार आहे. मत मंडण्याचे स्वातंत्र्य आहे. कंगना राणावतने मुंबईवर टीका केली नसून राज्य सरकारवर टीका केली आहे. टीका केली म्हणून तिला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका घेणे लोकशाही विरोधी आहे. कंगना राणावत(kangna ranawat) यांना भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार मुंबईत राहण्याचा अधिकार आहे. तिला कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष कंगना राणावतला संरक्षण देईल, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले(ramdas athavle) यांनी व्यक्त केले.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणावतला धमकी देणे योग्य नाही. कंगना राणावत यांनी सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात मांडलेली मते असो की सुरक्षा यंत्रणेवरून राज्य सरकारवर केलेली टीका असो या प्रकरणी कंगनावर तिला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही,अशी भूमिका घेणे योग्य नाही. कंगना राणावतला मुंबईत पाऊल ठेवण्यास कोणी विरोध करणार असेल तर रिपब्लिकन पक्ष कंगना राणावतचे संरक्षण करील, असा इशारा रामदास आठवले यांनी आज दिला आहे.