धारावी नियंत्रणात , दादरमध्ये रुग्ण वाढ कायम

जी उत्तर विभागात ५३ रुग्ण 

मुंबई :  धारावी आज केवळ ५  नवीन रुग्ण सापडले असून बाधित रुग्णांची संख्या २६१७ वर पोहोचली आहे. धारावी नियंत्रणात आली असली आता दादर-माहीम मधील रुग्णसंख्या काहीशी वाढतांना दिसते. दादर मध्ये आज ३१ नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही २०२० इतकी झाली आहे.

 माहीम मध्ये आज १७ नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या १८५५ इतकी झाली असून आज मृत्यूची नोंद झाली नाही.दरम्यान, जी उत्तर विभागातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत ५३ रुग्णांची भर पडली असून जी उत्तर विभागातील रुग्णसंख्या ही ६४९२ वर पोहोचली आहे.