मुंबईत कोरोनाचे ९४१ नवे रुग्ण , ५५ कोरोनाबाधितांचा मृत्यू

मुंबई : मुंबईमध्ये मंगळवारी ९४१ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ६० हजार १४२ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ३१६५ वर पोहचला

 मुंबई : मुंबईमध्ये मंगळवारी ९४१ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ६० हजार १४२ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ३१६५ वर पोहचला आहे. 

मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मुंबईमध्ये ५५ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये ३४ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ४३ पुरुष तर १२ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील दोन जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. २९ जण हे ६० वर्षांवरील, तर २४ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

मुंबईत कोरोनाचे ७७२ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ४३ हजार १५ वर पोहचली आहे. तसेच ९१५ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ३१ हजार ४०जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.