आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मिळणार २८ हजारपर्यंत प्रशिक्षण शुल्क,ऑनलाईन अर्ज करण्याचे नवाब मलिक यांचे आवाहन

अडीच लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील आयटीआयच्या विद्यार्थ्यांना(ITI students) १०० टक्के तर अडीच लाख ते ८ लाख रुपयांदरम्यान उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना ८० टक्के रक्कमेच्या प्रशिक्षण शुल्क दिले जाते. या विद्यार्थ्यांना भराव्या लागलेल्या प्रशिक्षण शुल्कामधून शासकीय आयटीआयच्या प्रशिक्षण शुल्काइतकी रक्कम वगळून उर्वरित रक्कम विद्यार्थ्यांना दिली जाते.

    मुंबई :शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) (ITI)पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर प्रवेश घेणाऱ्या तसेच खाजगी आयटीआयमधून शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने प्रवेश(Online admission) घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्काचा लाभ देण्यात येत आहे. या याेजनेतून २८ हजार ८०० रुपयांपर्यंत प्रशिक्षण शुल्क लाभ देण्यात येत असताे. चालू शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रथम आणि द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.

    अडीच लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील आयटीआयच्या विद्यार्थ्यांना १०० टक्के तर अडीच लाख ते ८ लाख रुपयांदरम्यान उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना ८० टक्के रक्कमेच्या प्रशिक्षण शुल्क दिले जाते. या विद्यार्थ्यांना भराव्या लागलेल्या प्रशिक्षण शुल्कामधून शासकीय आयटीआयच्या प्रशिक्षण शुल्काइतकी रक्कम वगळून उर्वरित रक्कम विद्यार्थ्यांना दिली जाते. त्यामुळे या योजनेतून विविध अभ्यासक्रमानुसार १९ हजार २०० ते २८ हजार ९०० रुपये इतकी रक्कम विद्यार्थ्यांना परत मिळते, असे मलिक यांनी सांगितले.

    या योजनेतून लाभासाठी विद्यार्थ्यांना १० मार्च २०२१ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याचा मोठ्या प्रमाणात फायदा गरीब व गरजू विद्यार्थ्यांना होणार आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन मलिक यांनी केले आहे.