जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे ३१ जुलैला फेसबुक लाईव्ह

जनतेच्या मनात असलेल्या प्रश्नांचे निराकरण व्हावे, यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, जळगावच्या वतीने फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जळगाव, (जिमाका): कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे.  या प्रयत्नांना आपल्या जळगाव जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व जनतेने समर्थ साथ दिली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात काही प्रश्न असू शकतात याची जिल्हा प्रशासनाला कल्पना आहे. जनतेच्या मनात असलेल्या प्रश्नांचे निराकरण व्हावे, यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, जळगावच्या वतीने फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी दिली आहे. 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शुक्रवार, दि. ३१ जुलै, २०२० रोजी दुपारी १२:०० वाजता जनतेशी LIVE स्वरूपात संवाद साधून जनतेच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. 

हा संवाद https://www.facebook.com/CollectorateJalgaon या फेसबुक पेजवरून होणार आहे. तेव्हा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना विषाणू व त्यासंबंधी जिल्ह्यातील परिस्थितीबाबत त्यांच्या मनातील शंका, समस्या, प्रश्न  या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मांडावेत. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी बोडके यांनी केले आहे.