कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना बळींची संख्या ५०० पार

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना बळींच्या संख्येने ५०० चा आकडा ओलांडला असून आतापर्यंत महानगरपालिका क्षेत्रात कोरोनामुळे तब्बल ५०३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मृतांचा आकडादेखील तेवढाच वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

कल्याण डोंबिवलीमध्ये आज नव्या २५० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ६ जणांचा मृत्यू झाला असून ४८३ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या २५० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या २४,६७० झाली आहे. यामध्ये ३५३१ रुग्ण उपचार घेत असून २०,६३६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत ५०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजच्या २५० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व – ३३,  कल्याण पश्चिम- ५२,  डोंबिवली पूर्व-९९, डोंबिवली पश्चिम – ४०, मांडा टिटवाळा -१८, मोहना – ७, तर पिसवली येथील एका रुग्णाचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १०५ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ११ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ३ रुग्ण होलीक्रॉस रुग्णालयातून, १० रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, २ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, ४ रुग्ण आसरा फाऊंडेशन स्कूलमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून, होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.