कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला २४ हजारांचा टप्पा

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी २४ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज नव्या २८८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७ जणांचा मृत्यू झाला असून ४६१ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या २८८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या २४,१०० झाली आहे. यामध्ये ३७९९ रुग्ण उपचार घेत असून १९८१२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ४८९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजच्या २८८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व -६१,  कल्याण प.- ६५,  डोंबिवली पूर्व- ९०, डोंबिवली प- ५१, मांडा टिटवाळा १३, तर मोहना येथील ८ रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी  १२७ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून,  १२  रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ४ रुग्ण बाज आर. आर. रूग्णालयामधून, ३ रुग्ण हॉलीक्रॉस रुग्णालयातून, ८ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.