शिवसेनेच्या वाहतूक सेना भिवंडी तालुका अध्यक्षपदी किशोर चौधरी यांची निवड

भिवंडी: शिवसेना(shivsena) प्रणित महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी यांनी किशोर चौधरी(kishor choudhary) यांना महाराष्ट्र वाहतूक सेना(maharashtra wahtuk sena) भिवंडी तालुका अध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र दिले. तसेच उपाध्यक्षपदी चेतन माळी यांची निवड झाल्याने त्यांनाही उदय दळवी यांनी पत्र दिले.

दरम्यान भिवंडी पूर्वचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी वाहतूक सेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करु‌न पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील‌ दिल्या आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्य वाहतुक सेनेचे सरचिटणीस,वाहतूक सेनेचे भिवंडी शहर अध्यक्ष मुशीर मोमीन, उत्तम चौधरी,आखिल शेख उपस्थित होते.

कोरोना काळात सर्वत्र लाॅकडाऊनमुळे सर्व व्यवसाय डबघाईला गेले आहेत. त्यामुळे आज वाहतुकदारांना खंबीर नेतृत्वाची गरज असून त्यांची विश्वासहर्ता जपणे ही अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने सर्वसामान्य वाहतुकदार व जनतेला अभिप्रेत असणारी वाहतूक सेना उभारु व  एक वर्षाच्या काळात सर्वांना बरोबर घेऊनच काम करणार असल्याचे यावेळी नवनिर्वाचित भिवंडी तालुका अध्यक्ष किशोर चौधरी यांनी सांगितले आहे.