राज्याचा रिकव्हरी रेट पोहोचला ९३.५४ टक्क्यांवर, ४६१० रुग्णांना गेल्या २४ तासांत मिळाला डिस्चार्ज

साेमवारी राज्यात २,९४९ नवीन कोरोना रुग्णांची(corona patients in maharashtra) नाेंद झाली आहे. तर आज राज्यात ४,६१० रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत १७,६१,६१५ कोराेनाबाधित रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे हाेण्याचे बरे ९३.५४ % एवढे झाले आहे.

मुंबई : साेमवारी राज्यात २,९४९ नवीन कोरोना रुग्णांची(corona patients in maharashtra) नाेंद झाली आहे. तर आज राज्यात ४,६१० रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत १७,६१,६१५ कोराेनाबाधित रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे हाेण्याचे बरे ९३.५४ % एवढे झाले आहे. आज राज्यात ६० कोराेना मृत्यूची नाेंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १८,८३,३६५ झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण ७२,३८३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान राज्यात साेमवारी ६० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. आज नोंद झालेल्या एकूण ६० मृत्यूपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २५ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २५ मृत्यू नाशिक -११, अमरावती-६, पुणे-३, परभणी-२, नांदेड-२ आणि नागपूर-१ असे आहेत.

दरम्यान आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१७,४८,३६२ प्रयाेगशाळा नुमन्यांपैकी १८,८३,३६५ (१६.०३ टक्के)नमुने पाॅझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,०४,४०६ व्यक्ती हाेम क्वारंटाईन असून ४,३३५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.