महाराष्ट्र सरकारला आत्मचिंतनाची गरज असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपाय सीबीआयने करावा, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास वाढवणारा असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने असे सांगितले आहे की, पाटण्यामध्ये दाखल एफआयआर सर्वसमावेशक आहे. सुशांतच्या मृत्यूसंदर्भातील इतर कोणत्याही खटल्याचा तपास सीबीआयने करावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारने सीबीआयला मदत करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. महाराष्ट्र सरकारने या निर्णयाच्या विरोधात दाद मागण्यासंबंधी विचारले असता न्यायालयाने नकार दिला आहे.