लहान मुलांवरील अत्याचारात महाराष्ट्र टॉप तीन मध्ये, तर महिलांवरील अत्याचारात राज्याचा चौथा क्रमांक, पण…

उत्तर प्रदेशात खुनाच्या घटना सर्वाधिक आहेत. एकूण गुन्ह्यांविषयी बोलायचे झाले तर 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये गुन्हेगारीचे प्रमाण 28% वाढले आहे. अपहरण, महिला आणि मुलांवरील गुन्हे कमी झाले आहेत. 2020 मध्ये देशात एकूण 66,01,285 प्रकरणे नोंदवण्यात आली. जी 2019 मध्ये 51,56,158 इतकी होती. म्हणजेच एका वर्षात 14,45,127 गुन्हे वाढले आहेत.

  नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) ने बुधवारी 2020 या वर्षात झालेल्या गुन्ह्यांची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र चौथ्या नंबरला आहे. तर, लहान मुलांवरील अत्याचारात राज्याचा तीसरा नंबर लागतो. या आकडेवारीनुसार 2020 मध्ये देशात दररोज सरासरी 80 हत्या झाल्या. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवाल अर्थात एनसीआरबीनं नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालातली ही धक्कादायक आकडेवारी आहे.

  उत्तर प्रदेशात खुनाच्या घटना सर्वाधिक आहेत. एकूण गुन्ह्यांविषयी बोलायचे झाले तर 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये गुन्हेगारीचे प्रमाण 28% वाढले आहे. अपहरण, महिला आणि मुलांवरील गुन्हे कमी झाले आहेत. 2020 मध्ये देशात एकूण 66,01,285 प्रकरणे नोंदवण्यात आली. जी 2019 मध्ये 51,56,158 इतकी होती. म्हणजेच एका वर्षात 14,45,127 गुन्हे वाढले आहेत.

  या अहवालानुसार 2020 मध्ये देशात एकूण 29,193 हत्या झाल्या. म्हणजेच देशात दररोज सरासरी 80 लोकांचे खून होतात. 2019 मध्ये हत्यांचं प्रमाण 28,915 इतकं होतं. त्यामुळे 2019 च्या तुलनेत 79 ने अधिक आहे. यातील 10,404 लोकांच्या हत्या या आपापसातील मतभेदांमुळे झाल्या आहेत. तर, 4,034 जणांची हत्या जुन्या शत्रुत्वामुळे करण्यात आली. उत्तर प्रदेशात खुनाच्या घटना सर्वाधिक म्हणजे 3,779 इतक्या आहेत. उत्तर प्रदेशानंतर बिहार (3,150), महाराष्ट्र (2,163), मध्य प्रदेश (2,101) आणि पश्चिम बंगाल मध्ये (1,948) लोकांच्या हत्या झाल्या आहेत.

  कौटुंबीक हिंसाचारात वाढ

  देशात महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांची 3,71,503 प्रकरणे नोंदवण्यात आली. या गुन्ह्यांची संख्या 2019 मध्ये 4,05,326 इतकी होती. त्यामुळे 2019 च्या तुलनेत हे प्रमाण 8.3 टक्क्यांनी कमी आहे. 2020 मधील महिला अत्याचारात कौटुंबीक हिंसाचाराचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 30% इतके आहे. यात पती आणि नातेवाईकांकडून करण्यात येणाऱ्या हिंसाचाराचा समावेश आहे. यात विनयभंगाची 23% प्रकरणे, 16.8% प्रकरणे अपहरणाची आणि 7.5% प्रकरणे बलात्काराची होती. महिलांवरील अत्याचारात मध्य प्रदेशचा पहिला, उत्तर प्रदेशचा दुसरा तर महाराष्ट्राचा तीसरा क्रमांक लागतो.

  लहान मुलांच्या अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ

  देशात लहान मुलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांची 1,28,531 प्रकरणे नोंदवण्यात आली. जे 2019 च्या तुलनेत 13.2% कमी आहे. लहान मुलांवरील अत्याचारांमध्ये सर्वाधिक 42.6% गुन्हे अपहरणाचे आहेत. तर, मुलांवरील लैंगिक हिंसेची 38.8% प्रकरणे नोंदली गेली. लहान मुलांवरील अत्याचारांमध्ये देखील मध्य प्रदेशचा पहिला, उत्तर प्रदेशचा दुसरा तर महाराष्ट्राचा तीसरा क्रमांक लागतो.