मळेघर ग्रामपंचायतीतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

पेण: कोरोना काळात गोरगरीब जनतेची सेवा केलेल्या ग्रुप ग्रामपंचायत मळेघर हद्दीतील कोरोना योद्धांबद्दल नितांत आदर असल्यामुळे मळेघर ग्रामपंचायत मासिक सभेत कोरोना योद्ध्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. कृतज्ञतादर्शक ,प्रतीकात्मक सन्मानपत्र देण्याबाबतचा ठराव एकमुखाने संमत झाला.

ग्रुप ग्रामपंचायत मळेघरमध्ये आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सरपंच, सर्व मळेघर ग्रामपंचायत सदस्य यांच्यासोबत त्यांच्या प्रांत अधिकारी प्रतिमा  पूदलवढ, पेण तहसीलदार अरुणा जाधव, डीवायएसपी नितीन जाधव, पेण पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव, पेण पंचायत समितीच्या सभापती, पेण प्रेस व संपादक संघटना यांना ग्रुप ग्रामपंचायत मळेघरचे सरपंच शरद बाळाराम पाटील, समाजसेवक मच्छिंद्र पाटील, ग्रामसेवक व सर्व सदस्य तसेच वासुदेव म्हात्रे- आरोग्य सेवक मळेघर यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.