ममतांच्या अडचणीत वाढ, आमदाराने केले मोदींचे कौतुक

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या(west bengal election) पार्श्वभूमीवर तृणमूल - भाजपा आमने-सामने उभे ठाकले असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पक्षांतर्गत रोषाचा सामना करावा लागत आहे. तथापि बंडखोरी मोडित काढण्यासाठी त्यांनी कारवाईचे अस्त्रही उपसले आहे. पक्षाचे एक अन्य आमदार जितेंद्र तिवारी यांनी मोदींचे कौतुक करून ममतांच्या संतापात भर टाकली आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या(west bengal election) पार्श्वभूमीवर तृणमूल – भाजपा आमने-सामने उभे ठाकले असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पक्षांतर्गत रोषाचा सामना करावा लागत आहे. तथापि बंडखोरी मोडित काढण्यासाठी त्यांनी कारवाईचे अस्त्रही उपसले आहे. पक्षाचे एक अन्य आमदार जितेंद्र तिवारी यांनी मोदींचे कौतुक करून ममतांच्या संतापात भर टाकली आहे. तिवारी यांनी मंत्री फिरहबाद हाकीम यांना पत्र लिहिले असून त्यात त्यांनी आसनसोलची निवड स्मार्ट सिटीसाठी झाली होती परंतु राजकीय कारणामुळे राज्य सरकारने या सुविधेच्या लाभापासून वंचित केले अशी तक्रार केली आहे.

मतुआ समाजावर शाह-ममतांची नजर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काही दिवसांपूर्वी बंगाल दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी मतुआ समाजाच्या घरी जेवण केले होते. बंगालच्या राजकारणात या समाजाचे महत्त्व मोठे आहे आणि याचाच फायदा घेत भाजपा आदिवासी आणि अनुसूचित जाती -जमातीवर फोकस करून आपले मिशन – २०० पूर्ण करण्यास इच्छुक आहे. पश्चिम बंगालमध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या १.८४ कोटी असून यात ५० टक्के संख्या मतुआ समाजाची आहे. मतुआ समाजा हिंदू धर्म मानतो. या समाजाची स्थापना १९८० मध्ये हरिश्चंद्र ठाकूर यांनी केली होती. या समाजाचे लोक त्यांना विष्णूचा अवतार मानतात. प्राप्त माहितीनुसार या समाजाची लोकसंख्या जवळपास तीन कोटी असून बंगालमधील बनगाव परिसरात या संप्रदायाची लोकसंख्या ६५ टक्के आहे. कृष्णानगर, सिलीगुडी, रानाघाट, कूचबिहार, मालदा उत्तर, रायगंज, मालदा दक्षिण, जॉयनगर, बर्धमान पूर्व, बर्धमान पश्चिम या मतदारसंघात या संप्रदायाची पकड आहे.

विजयवर्गीय यांना ‘झेड’ सुरक्षा
भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांच्या सुरक्षेत वाढ कऱण्यात आली आहे. पश्चिम बंगाल दौऱ्यात भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेकीची घटना घडली होती. विजयवर्गीय यांच्या गाडीवरही दगडफेक झाली होती. ज्यात विजयवर्गीय यांना दुखापत झाली होती. दगडफेकीच्या घटनेनंतर कैलास विजयवर्गीय यांच्या सुरक्षेत वाढ करून त्यांना आता झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. यासोबतच त्यांना आता बुलेटप्रूफ गाडी देखील देण्यात आली आहे. उल्लेखनीय असे की, पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपची जबाबदारी कैलास विजयवर्गीय यांना देण्यात आली आहे.