manish kumar

बिहारचे मनिष कुमार(manish kumar) यांना २०२० सालचा प्रा. यशवंतराव केळकर युवा पुरस्कार(yashwantrao kelkar award) जाहीर झाला आहे.

दिल्ली: बिहारचे मनिष कुमार(manish kumar) यांना २०२० सालचा प्रा. यशवंतराव केळकर युवा पुरस्कार(yashwantrao kelkar award) जाहीर झाला आहे. तरुणांना स्थायी जैविक आणि बहुप्रचलित शेती मॉडेलकडे आकर्षित केल्याबद्दल तसेच तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण रोजगारासाठी काम  केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. नागपूरमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या(अभाविप) अधिवेशनामधध्ये हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद निर्माण करणारे प्रा. यशवंतराव केळकर यांच्या स्मरणार्थ १९९१ पासून दरवर्षी दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार मनिष कुमार यांंना जाहीर झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २५-२६ डिसेंबर २०२० ला नागपूरमध्ये अभाविपचे ६६वे राष्ट्रीय अधिवेशन होँणार आहे. यात २६ डिसेंबरला सकाळी ११.३० वाजता या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

विविध समाजोपयोगी काम करणाऱ्या काम करणाऱ्या युवा सामाजिक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि १ लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.