मनोज सिन्हा यांनी घेतली जम्मू- काश्मीरच्या उपराज्यपाल पदाची शपथ

मनोज सिन्हा हे ग्रामीण भागात चांगला जनसंपर्क असणारे नेते म्हणून ओळखले जातात.बुधवारी गिरीश चंद्र मुर्मू यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी उपराज्यपाल म्हणून मनोज सिन्हा काम करतील हे निश्चित झाले. मुर्मू यांना कॅगची जबाबदारी देण्यात आली आहे.

माजी केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांनी आज जम्मू- काश्मीरच्या उपराज्यपाल पदाची शपथ घेतली. केंद्रशासित प्रदेशाचे प्रभारी म्हणून काम करणारे ते पहिले नेता आहेत. जम्मू-काश्मीरच्या मुख्य न्यायाधीश गीता मित्तल यांनी मनोज सिन्हा यांना राजभवनामध्ये उपराज्यपाल पदाची शपथ दिली. 

मनोज सिन्हा हे ग्रामीण भागात चांगला जनसंपर्क असणारे नेते म्हणून ओळखले जातात.बुधवारी गिरीश चंद्र मुर्मू यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी उपराज्यपाल म्हणून मनोज सिन्हा काम करतील हे निश्चित झाले. मुर्मू यांना कॅगची जबाबदारी देण्यात आली आहे.

मनोज सिन्हा यांच्या उपराज्यपाल पदाच्या आजच्या शपथविधीसाठी फारुक खान, बशीर खान तसेच उपराज्यपालांचे सल्लागार, इतर कर्मचारी आणि पोलीस उपस्थित होते. राज्यसभा सदस्य नजीर अहमद लवाय,लोकसभा सदस्य जुगल किशोर शर्मा, जम्मू काश्मीरमधील नेता गुलाम हसन मीर इत्यादी मान्यवरही यावेळी उपस्थित होते.