mansukh hiren

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण(mansukh hiren case) आणि स्कॉर्पिओ कार चोरी प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थान एनआयएकडे जाण्याची शक्यता आहे.

    मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण(mansukh hiren case) आणि स्कॉर्पिओ कार चोरी प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थान एनआयएकडे जाण्याची शक्यता आहे. एनआयए सध्या मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या २० जिलेटीन आणि कारच्या शोधात आहे.

    मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि स्कॉर्पिओ कार चोरी प्रकरण एकमेकांशी संबंधित असल्याने दोन्ही प्रकरणाचा तपास एनआयएकडे जाण्याची शक्यता आहे.

    जेव्हा एखादी केस एका एजन्सीकडून दुसऱ्या एजन्सीकडे सोपवली जाते तेव्हा त्या तपासणीच्या आधी संबंधित अधिकाऱ्यांना तपासासाठी बोलवले जाते. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या सीआययूकडे होता. याचे तपास अधिकारी सचिन वाझे होते. त्यांच्यावर असलेल्या आरोपांमुळे एनआयएने त्यांना तपासासाठी बोलावले.

    सीआययूनंतर तपासाची जबाबदारी गुन्हे शाखेचे एसीपी नितीन अलनुकरे यांच्याकडे आहे. त्यामुले तपास कुठपर्यंत झाला हे जाणून घेण्यासाठी त्यांनाही बोलावण्यात आले. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास एटीएसकडे हस्तांतरित केला. त्यानंतर एटीएसचे एसीपी श्रीपाद काळे यांना चौकशीचे काम देण्यात आले होते. त्यांच्याकडे चौकशीचा फक्त एक दिवस होता आणि त्यानंतर हा खटला पुढील तपासासाठी एनआयएकडे वर्ग करण्यात आला. त्या एका दिवसाच्या तपासणीत त्यांना काय सापडले हे जाणून घेण्यासाठी एनआयएने त्यांनाही बोलावले आहे.

    मनसुख हिरेन प्रकरणात अजूनही एटीएसच्या हाती हवे तसे पुरावे आणि माहिती लागलेली नाही. मनसुख यांच्या मोबाईलचे लोकेशन वसई येथे कसे मिळाले? त्यांचे आणि सचिन वाझे यांचे नेमके काय संबंध होते? त्यांच्या तोंडावर इतके रुमाल का बांधण्यात आले होते? आणि महत्वाचे म्हणजे मनसुख यांची हत्या आहे की आत्महत्या या सर्व प्रश्नांची उत्तरे एटीएसला अजून सापडलेली नाहीत.