ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात एमबीए प्रवेश प्रक्रिया होणार सुरू

मुंबई  : एमबीए(mba) परीक्षा, एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया(entrance) ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येईल, पदवीच्या अंतिम वर्षाचे निकाल घोषित झाल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

सामंत म्हणाले, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमएएच – एमबीए / एमएमएस – २०२० ही सामाईक प्रवेश परीक्षा १४ व १५ मार्च २०२० रोजी घेण्यात आलेली आहे. या परीक्षेचा निकाल २३ मे, २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. एमएएच – एमबीए / एमएमएस – २०२० च्या प्रवेश प्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नयेत. याबाबतची अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांना वेळोवेळी देण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.