st bus

एसटी(st) महामंडळातील अधिकारी - कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय कोविडचा(corona affected employee) संसर्ग होऊन आजारी पडल्यास त्यासाठी होणाऱ्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती महामंडळाकडून देण्यात येणार आहे. हा निर्णय २ सप्टेंबर 2020 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहील.

    मुंबई: कोरोनाची लागण(corona affected employees) झाली आहे, अशा एसटी(st employee) महामंडळातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही आता वैद्यकीय उपचाराचा खर्च मिळणार आहे. २ सप्टेंबर २०२० पासून वैद्यकीय उपचारासाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

    सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध आजारांच्या उपचारांसाठी होणाऱ्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती सरकारकडून केली जाते. अशा ‍विविध २७ आकस्मिक आजारांमध्ये कोविड-१९ या आजाराचा नुकताच समावेश करण्यात आला आहे.

    शासनाने ‍दिलेल्या मान्यतेनुसार वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी वेळोवेळी केलेले बदल हे राज्य ‍परिवहन महामंडळासाठीही लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार एसटी महामंडळातील अधिकारी-कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय कोविडचा संसर्ग होऊन आजारी पडल्यास त्यासाठी होणाऱ्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती महामंडळाकडून देण्यात येणार आहे. हा निर्णय २ सप्टेंबर २०२० पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहील. या संदर्भातील परिपत्रक कर्मचारी वर्गाचे महाव्यवस्थापक माधव काळे यांनी जारी केले आहे.