doctor

केंद्र सरकारने आयुर्वेदिक डाॅक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला आयएमए (ॲलाेपॅ‌थी) डाॅक्टरांच्या संघटनेने विराेध करत शुक्रवारी राज्यसह मुंबईत आराेग्य सेवा बंद ठेवण्याची हाक देण्यात आली हाेती.

मुंबई: केंद्र सरकारने आयुर्वेदिक डाॅक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला आयएमए (ॲलाेपॅ‌थी) डाॅक्टरांच्या संघटनेने विराेध करत शुक्रवारी राज्यसह मुंबईत आराेग्य सेवा बंद(doctors strike) ठेवण्याची हाक देण्यात आली हाेती. याच पार्श्वभूमीवर, शुक्रवारी सकाळपासून मुंबईतील खासगी दवाखाने व रुग्णालयीन आराेग्यसेवा बंद हाेती. पण सरकारी व पालिका रुग्णालयातील रुग्णसेवा नियमित सुरु असल्याचे चित्र दिसून आले. ज्यामुळे मुंबईत या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दुसरीकडे, आयुष संघटनेने (युनानी, हाेमिओपॅथी, आयुर्वेदिक) केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत डाॅक्टरांनी आज गुलाबी फित बांधून रुग्णसेवा केली.

सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनकडून (सीसीआयएम) राजपत्रात अधिसूचना प्रकाशित केली असून या अधिसूचनेला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध करत शुक्रवारी राज्यातील आराेग्य सेवा बंद ठेवण्यात आली. मात्र या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आले. राज्यव्यापी पुकारण्यात आलेल्या या बंद मध्ये इंडियन मेडिकल असाेिसएशनचे ४५ हजार डाॅक्टर सहभागी झाले असल्याचे इंडियन मेडीकल असाेसिएशनकडून सांगण्यात आले. या दरम्यान, मुंबई शहर व उपनगरातील खासगी रुग्णसेवा बंद ठेवण्यात आली हाेती. मात्र सरकारी व पालिका रुग्णालयातील रुग्णसेवा सुरु असल्याचे दिसून आले.

केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत सीसीआयएमने ५८ शस्त्रक्रियांना शल्यतंत्र आणि शालाक्य तंत्र सांगून पदव्युत्तर शिक्षणात समाविष्ट करण्यात आले आहे. जनरल सर्जरी, युरॉलॉजी (मूत्ररोग शस्त्रक्रिया), सर्जिकल गॅस्ट्रोएंटरॉलॉजी, ( पोटाच्या आणि आतड्याच्या शस्त्रक्रिया) इ.एन.टी. (नाक-कान-घसा), ऑफ्थाल्मोलॉजी (नेत्ररोग शस्त्रक्रिया) आणि डेंटिस्ट्री (दंतरोग शास्त्रक्रिया) यांचा समावेश आहे, अशा प्रकारची परवानगी देणे घातक असून यामुळे रुग्णांवर विपरीत परिणाम हाेण्याची शक्यता इंडियन मेडीकल असाेसिएशनने व्यक्त केली आहे.

आयुर्वेदिक, युनानी व हाेमिओपॅथी डाॅक्टरांवर आमचा काेणताही विराेध नाही. मात्र याबाबत केंद्र सरकारने फेरविचार करत ‘मिक्सपॅथी’ बंद करावी, यामुळे रुग्णांची दिशाभूल हाेईल, त्यांना येाग्य उपचार मिळावेत अशी आमची अपेक्षा आहे. यामुळे मेडीकल टुरिझमवर देखील परिणाम हाेण्याची शक्यता असल्याचे आयएमएचे राज्य सेक्रेटरी डाॅ. पंकज बांदरकर यांनी सांगितले.