आमदार निकोलेंनी केला पालघरमधील पूरग्रस्त भागाचा दौरा

डहाणू: पालघरमध्ये(palghar) गेल्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टीमुळे गोर -गरीब आदिवासींचे मोठे नुकसान झाले.  त्यामुळे पूरग्रस्त भागात पाहणी केल्यानंतर नुकसानग्रस्तांना मार्क्सवादी पक्षाचे डहाणू विधानसभेचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले(mla vinod nikole) यांनी तिथे मदत केली.

आ. निकोले म्हणाले की, अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले आहे ते भरून न येण्यासारखं आहे. मध्यंतरी पालघर जिल्हातील डहाणू, तलासरी भागात मुसळधार अतिपावसामुळे येथील आदिवासी बांधवाचे खूप नुकसान झाले आहे. यामुळे आम्ही सायवन, नीबापूर, बापूगाव, गागोडी, कास पाडा या गावात भेट देऊन आम्ही तेथील झालेली नुकसान आम्ही बघितल काही जणांचे घराचे पत्रे उडून गेले तर काही जण पूर्ण बेघर झाले.

लॉकडाऊन काळात बेरोजगार झालेले आदिवासी कसेबसे आपले जीवन शेती करून जगत आहेत. मात्र या नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचे खूप नुकसान झाले आहे. या पिकाची पाहणी आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी शेतात जाऊन केली होती तर रायगड जिल्ह्यात निसर्ग वादळात जितके नुकसान झाले होते त्याच्या बरोबरच पालघर जिल्हयातील डहाणू व तलासरी भागात मोठया प्रमाणात नुकसान दिसून येते. तसेच पालघर जिल्याला मुख्यमंत्र्यांनी तात्काळ ५० कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी,अशी आमची विनंती आहे. यावेळी निकोले यांनी आदिवासी बांधवांना धीर दिला आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.