letter to thief

मध्य प्रदेशमधील बैतूलमधील मलकापूर गावातल्या लोकांनी एका चोराला चिठ्ठी लिहीली आहे.(villagers letter to thief) त्यामुळे हे गाव खूप चर्चेत आले आहे.

आपल्या नातेवाईकांना किंवा मित्रमैत्रिणींना पत्र, चिठ्ठी लिहिताना तुम्ही अनेकांना बघितलं असेल. मात्र मध्य प्रदेशमधील बैतूलमधील मलकापूर गावातल्या लोकांनी एका चोराला चिठ्ठी लिहीली आहे.(villagers letter to thief) त्यामुळे हे गाव खूप चर्चेत आले आहे.

गावातील स्मशान भूमीमधून पाण्याचे पाईप चोरणाऱ्या चोरासाठी गावकऱ्यांनी एक विनंतीपर चिठ्ठी लिहीली आहे. ती स्मशानामध्ये चिकटवून ठेवली आहे. गावकऱ्यांनी स्मशानाच्या आजूबाजूला असणाऱ्या झाडांना पाणी देण्यासाठी पाण्याचे पाईप विकत घेतले होते. ते चोराने चोरले. त्यामुळेच गावकऱ्यांनी गांधीगिरी करत चोरासाठी खास चिठ्ठी लिहीली आहे.

पत्राला ‘एक चिठ्ठी चोरो के नाम’ असं नाव देण्यात आलं असून पत्राची सुरुवात ‘प्रिय चोरा…’, अशी करण्यात आली आहे.  यात पुढे म्हटलं आहे की,“एक दिवस तुलाही याच मोक्षस्थळी (स्मशानात) यायचं आहे. त्यामुळे येथून चोरी केलेलं सामान गपगुमान परत ठेवून जा.”

या गावामधील गावकऱ्यांनी स्मशानाच्या आजूबाजूला  ७० झाडं लावली आहेत. गावामध्ये कोणचाही मृत्यू अथवा जन्म झाल्यानंतर त्याच्या नावाने स्मशानाजवळ गावकरी झाड लावतात. याच झाडांना पाणी घालण्यासाठी गावकऱ्यांनी पाण्याचे पाईप विकत घेतले होते. हे पाईप  आणि इतर सामान विकत घेण्यासाठी लोकांकडून निधी गोळा करण्यात आला होता.  या सर्व गोष्टी स्मशानभूमीमध्येच ठेवलेल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच हे पाईप आणि पाण्याचे वॉल्व्ह चोरीला गेल्याने गावकरी संतापले.

चोरीबाबत गावकऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप पोलिसांना चोराचा शोध घेता आला नाही. त्यामुळेच गावकऱ्यांनी चोराला चिठ्ठी लिहिण्याचा निर्णय घेतला. स्मशानभूमीसोबतच गावातील घरांवरही ही चिठ्ठी लावण्यात आली आहे.

स्मशानातून वस्तू चोरणाऱ्या चोरालाही शेवटी स्मशानातच यायचं असल्याने त्याने चोरी केलेल्या वस्तू परत कराव्यात अशी मागणी गावकऱ्यांनी या चिठ्ठीमध्ये करण्यात आली आहे. या चिठ्ठीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.