corona vaccination

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी डॉक्टर, पोलिसांसह लष्करातील जवान आणि माजी सैनिक (ex-servicemen ) व त्यांच्या परिवाराचं (families)  अग्रक्रमाने लसीकरण करण्यात यावं अशी मागणी मनसेकडून करण्यात (MNS demands ) आली आहे.

मुंबई : कोरोनावरील(corona ) लस अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे जगभरात कोरोना लस (corona vaccination) पहिली कोणाकोणाला द्यायची यावर भाष्य करताना दिसत आहेत. राज्यातही कोरोना लस आल्यानंतर सुरुवातीला डॉक्टर, पोलीस आणि कोरोना सेवकांनाच दिली जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी (Rajesh Tope) केली. याच वक्तव्यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी डॉक्टर, पोलिसांसह लष्करातील जवान आणि माजी सैनिक (ex-servicemen ) व त्यांच्या परिवाराचं (families)  अग्रक्रमाने लसीकरण करण्यात यावं अशी मागणी मनसेकडून करण्यात (MNS demands ) आली आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विट करत लस देशासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही सुरुवातीला द्यावी असे म्हटले आहे. कोरोनाची लस आल्यावर ती डॉक्टर, पोलीस व इतर आरोग्य सेवकांना प्रथम देण्यात येणार असेल काल आरोग्य मंत्री बोलले, परंतु या बरोबरच सर्व सैनिक, माजी सैनिक व त्यांच्या परिवाराला अग्रक्रमाने लसीकरण करण्यात यावे कारण हे सर्वेच देशासाठी बलिदान देण्यात अग्रेसर असतात. असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.

सरकारच्या प्रोटोकॉलनुसारच लसीकरण – टोपे

सरकारच्या प्रोटोकॉलनुसारच लसीकरण होणार आहे. कोरोना व्हॅक्सिन लवकर येण्याबाबत आशा आहे. त्यासाठी प्रयत्न सुरु असून डॉक्टर्स, ज्येष्ठ नागरिक, पोलिसांना सर्वात आधी व्हॅक्सिन देण्यात येईल आणि तसे नियोजन सध्या सुरु असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. आरोग्यमंत्री टोपे यांनी जालन्यातील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.