पेणमधील खड्ड्यांच्या संदर्भात मनसे आक्रमक

पेण : पेण शहरात पावसाळ्याच्या पूर्वीच नव्याने रस्ते तयार करण्यात आले. मात्र पावसाळा सुरू होताच शहरातील रस्त्यांवर खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. पेण शहर हे तालुक्याचे बाजारपेठ असल्यामुळे आजूबाजूच्या गावातील नागरिक येथे खरेदीसाठी येत असतात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे . काही वेळेस दुचाकीचे अपघातही होत आहेत. येत्या दोन दिवसात शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, असे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव रुपेश पाटील यांनी पेण नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.

दोन दिवसांमध्ये शहरातील खड्डे भरले नाही नाहीत तर खड्डे महोत्सव कार्यक्रम करू आणि प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्याधिकाऱ्यांना आमंत्रित करू असे रुपेश पाटील यांनी सांगितले आहे.