मोदी सरकारचा मोठा निर्णय ; जम्मू काश्मीरमधून १० हजार जवानांना तात्काळ हटवण्याचे आदेश

केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधून निमलष्करी दलाच्या १० हजार जवानांना तात्काळ  माघारी बोलावण्याचा आदेश दिला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे याबाबत पीटीआयने वृत्त दिलं आहे.

 दरम्यान, याआधीही  केंद्रीय गृहमंत्रालयाने मे महिन्यात केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या १० तुकड्या माघारी बोलवल्या होत्या.आजच्या गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार  सीआयएसएफ , बीएसएफ आणि एसएसबीच्या प्रत्येकी २० तुकड्या तर केद्रीय राखीव पोलीस दलाच्या ४० तुकड्या  या आठवड्याअखेर जम्मू काश्मीरमधून हटवल्या जातील. या तुकड्यातील एकूण १० हजार जवान माघारी बोलावल्यानंतर काश्मीर खोऱ्यात सीआरपीएफच्या केवळ ६० तुकड्या तैनात असतील ज्यात प्रत्येकी १००० जवान असतील.