मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबईः मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मोठ्या भावाचे कोरोनामुळे आज निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. महापौरांच्या भावाचे नाव सुनील कदम असे आहे. नायर रुग्णालयात गेल्या सात दिवसांपासून सुनील कदम यांच्यावर उपचार सुरु होते. आज सकाळी त्यांनी जगाचा निरोप घेतला. आपल्या भावाच्या मृत्यूनंतर किशोरी पेडणेकर यांनीआपल्या ट्विटर अकाऊंटवर एक कविता पोस्ट केली आहे.

याआधी एप्रिल महिन्यात महापौर १४ दिवस होम क्वारंटाईन झाल्या होत्या. कारण मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील लोकांना कोरोना झाला होता. आता जुलैमध्ये त्यांच्या भावाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. गेले ७ दिवस महापौरांच्या भावावर उपचार सुरु होते. मात्र आज महापौरांच्या भावाचे निधन झाले.