भाजपा-राष्ट्रवादी कधीच एकत्र येऊ शकत नाहीत : मंत्री नवाब मलिक

“भाजपा-राष्ट्रवादी कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. दोन्ही पक्षांच्या विचारधारा वेगळ्या आहेत. त्यामुळे, या चर्चांमध्ये अर्थ नाही. असं मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. बँकिंग रेग्युलेटरी अॅक्टमधील बदल राज्यातील सहकारी बँकांसाठी धोकादायक आहेत. याबाबत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चाही केली होती. मात्र या विषयावर भेटून चर्चा करू असे नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानंतर प्रत्यक्ष भेट घेऊन या विषयावर अधिक चर्चा झाली, अशी माहिती नवाब मलिक यांनी यावेळी दिली.

    दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाल्याने “राज्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि भाजपचे सरकरा येणार? अशा चर्चांना सुरुवात झाली. आता या सर्व तर्कवितर्कांना राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी “भाजपा-राष्ट्रवादीच्या विचारधारा वेगळ्या त्यामुळे कधीच एकत्र येऊ शकत नाहीत.” अशी प्रतिक्रीया देवून चर्चांना पुर्णविराम दिला आहे.

    “भाजपा-राष्ट्रवादी कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. दोन्ही पक्षांच्या विचारधारा वेगळ्या आहेत. त्यामुळे, या चर्चांमध्ये अर्थ नाही. असं मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. बँकिंग रेग्युलेटरी अॅक्टमधील बदल राज्यातील सहकारी बँकांसाठी धोकादायक आहेत. याबाबत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चाही केली होती. मात्र या विषयावर भेटून चर्चा करू असे नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानंतर प्रत्यक्ष भेट घेऊन या विषयावर अधिक चर्चा झाली, अशी माहिती नवाब मलिक यांनी यावेळी दिली.

    नवाब मलिक यांचे हे विधान अशा वेळी आले की, जेव्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीत सुमारे एक तासासाठी बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेल्या मुद्द्यांविषयी कोणतीही अधिकृत माहिती नाही.

    मात्र, शरद पवार हे राष्ट्रपती पदाचे दावेदार होऊ शकतात, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. त्याचवेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी शरद पवार आणि माजी संरक्षणमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एके अँटनी यांची शुक्रवारी भेट घेतली. या बैठकीला मुख्य संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख जनरल एमएम नरवणे हे देखील उपस्थित होते.