मिशन बिगीन अगेन अंतर्गत २७ मार्चपासून १५ एप्रिलपर्यंत नवे निर्बंध – रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात जमावबंदी, मार्गदर्शक सूचना जारी

नव्या नियमावलीनुसार(new guidelines for state) राज्यात रात्रीच्या जमावबंदीचे आदेश(night curfew) देण्यात आले आहेत. (mission begin again in Maharashtra)ज्यामध्ये पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी असेल. रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत जमावबंदी कायम असेल. यामध्ये नाक आणि तोंड झाकण्यासाठी मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे या नियमांचं पालन अनिवार्य असेल.

    शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे  पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्यात रोज कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने मिशन बिगीन अगेन अंतर्गत ( Mission Begin Again )काही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यातील वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्याने गाईडलाईन जारी केल्या आहेत. त्यानुसार राज्यात आज रात्री ८ वाजल्यापासून ते पहाटे ७ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच चौपाट्या, उद्याने, मॉल, सिनेमागृह यासाठीही सरकारने अनेक निर्बंध घातले असून सर्व प्रकारच्या कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आली आहे. येत्या १५ एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत.


    वर्क फ्रॉम होमचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा

    राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारच्या गाईडलाईन्सला अनुसरून वेळोवेळी त्यात बदल करण्यात आला आहे. मात्र, राज्यात करोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पुन्हा काही निर्बंध कडक करण्यात आले आहेत. तर, राज्यात २८ मार्चपासून रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाउन संदर्भात नव्याने गाईडलाईन जारी केल्या आहेत. या लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. बाहेर ६ फुटांचे अंतर राखणे गरजेच आहे, गर्दीच्या ठिकाणी थुंकल्यास दंड वसुल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर, खासगी कर्मचार्‍यांसाठी वर्क फ्रॉम होमचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा, असेही या आदेशात नमूद केले आहे.

    पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई

    आज रात्री ८ वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास प्रत्येकी १ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. आज रात्री ८ वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत उद्याने आणि चौपाट्यांसह सर्व सार्वजनिक स्थळे बंद राहतील. या ठिकाणी कुणीही नियमांचे उल्लंघन केल्यास प्रत्येक व्यक्तीला एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

    होम डिलिव्हरी सुरू राहणार

    मास्कशिवाय फिरणार्‍या व्यक्तीला ५०० रुपये दंड आकारण्यात येणार असून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १००० रुपये दंड आकारला जाणार आहे. रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिन्स बंद ठेवण्यात येणार आहेत. होम डिलिव्हरी आणि हॉटेलच्या वेळेलाही या नियमांचे बंधन असणार आहे. मात्र, होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे. घालून दिलेल्या नियमांचे हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमागृह किंवा मल्टिप्लेक्सच्या मालकांनी उल्लंघन केल्यास ही सर्व स्थळे कोरोना संकट संपेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.

    लग्न समारंभासाठी फक्त ५० तर अंत्यविधीसाठी २० जणांना परवानगी

    रात्री आठ ते सकाळी सातच्या कालावधीत पाच पेक्षा अधिक लोक गोळा झाल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. तसेच, १ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. २७ मार्चच्या मध्यरात्रीपासून रात्री ८ ते सकाळी सात पर्यंत बगीचे, चौपाट्या यासारख्या सार्वजनिक ठिकाणे बंद राहणार आहेत. सर्व सिनेमाहॉल व मल्टिप्लॅक्स, मॉल्स, रेस्टॉरंट देखील रात्री ८ ते सकाळी ७ बंद राहणार आहेत. राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. लग्न समारंभासाठी फक्त ५० जणांना परवानगी देण्यात आली आहे. तर, अंत्यविधीसाठी २० जणांना परवानगी देण्यात आली आहे.

    आयसोलेशन

    घरीच विलगीकरण ( होम आयसोलेशन) बाबतीत कोणत्या वैद्यकीय व्यावसायिकाच्या निगराणीखाली उपचार सुरु आहेत ते स्थानिक प्रशासनाला कळवावे लागेल. तसेच गृह विलगीकरणात सर्व काळजी घेण्याची जबाबदारी त्या डॉक्टरची राहील. रुग्णाने विलगीकरण नियमांचा भंग केल्यास संबंधित डॉक्टरवर त्याची माहिती लगेच स्थानिक प्रशासनाला कळविण्याची जबाबदारी राहील. त्या डॉक्टरला अशा परिस्थितीत संबंधित रुग्णाच्या उपचार व देखरेखीच्या कामातून मुक्त होता येईल.

    धार्मिक स्थळांनी भाविकांची संख्या ठरवावी

    शासकीय कार्यालयांतील गर्दी कमी करण्यासाठी अभ्यागत नागरिकांना अगदी आवश्यक आणि तत्काळ कामांसाठीच प्रवेशाची परवानगी देण्यात येईल. बैठका आदि कामासाठी निमंत्रित केले असल्यास विशेष प्रवेश पास कार्यालयामार्फत दिला जाईल हे कार्यालय किंवा विभाग प्रमुखाने पाहावे. सर्व धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाने दर तासाला कमाल किती भाविक असावेत ते निश्चित करावे. त्या ठिकाणी वावरण्यास पुरेशी जागा व आरोग्याचे नियम पाळले जात आहेत किंवा नाहीत ते सुनिश्चित करावे. ऑनलाईन आरक्षणावर भर द्यावा, असे आदेशात म्हटले आहे.