‘भगवे झेंडे महाराष्ट्रात नाही तर काय पाकिस्तानात लावायचे का?’, निलेश राणेंचा राज्य सरकारला सवाल

भाजपा निलेश राणे(nilesh rane) यांनी ट्विटरवर आपला संताप व्यक्त केला आहे. स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं आयुष्य पणाला लावलं. त्या महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांचा झेंडा काढण्याची वेळ या ठाकरे सरकारने आणली. महाराष्ट्रात ‘जय जिजाऊ जय शिवराय’चे झेंडे लावायचे नाही तर काय पाकिस्तानचे लावायचे?,” असा प्रश्न भाजपा नेते निलेश राणे यांनी केला आहे.

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा(maratha reservation) प्रश्न प्रलंबित आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप होत आहे. त्यातच मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालय अंतिम निर्णय देईपर्यंत मराठा समाजाच्या इच्छुक विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गासाठींच्या कोट्यातून (ईएसडब्ल्यू) शैक्षणिक लाभ घेण्यास परवानगी द्यावी याबाबत जनहित याचिका करण्यात आलेली आहे. उच्च न्यायालयाने त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास सोमवारी नकार दिला. यानंतर मराठा आरक्षणाबाबत मराठा क्रांती मोर्चाकडून अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत प्रवेश करणाऱ्या मार्गांवर पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. ठाण्यातून मुंबईच्या दिशेनं जात असलेल्या एका एसटी बसवरील भगवा झेंडा पोलिसांनी हटवण्यास सांगितल्याचा प्रकार सोमवारी समोर आला होता. यानंतर आता विरोधकांकडून सरकारवर टीका करण्यात येत आहे.

भाजपा नेते निलेश राणे यांनी ट्विटरवर आपला संताप व्यक्त केला आहे. “स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं आयुष्य पणाला लावलं. त्या महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांचा झेंडा काढण्याची वेळ या ठाकरे सरकारने आणली. महाराष्ट्रात ‘जय जिजाऊ जय शिवराय’चे झेंडे लावायचे नाही तर काय पाकिस्तानचे लावायचे?” असा प्रश्न निलेश राणे यांनी विचारला आहे. ठाण्यातील आनंदनगर येथून मुंबईच्या दिशेनं जात असलेल्या एसटी महामंडळाच्या बसवरील भगवा झेंडा पोलिसांनी हटवण्यास सांगितला होता. त्यानंतर एसटी चालकानं हा झेंडा काढला.