हे समजल्यावर पोलीस झाले सुन्न – नववीतल्या विद्यार्थिनीवर ८ तरुणांनी सलग १३ दिवस केला बलात्कार, ६ आरोपी अल्पवयीन

नववीत शिक्षण घेणारी पीडित मुलगी २० नोव्हेंबर रोजी मैत्रिणींना भेटायला जाते, असं सांगून घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर अंबिकापूर येथे ती मैत्रिणींना भेटण्यासाठी गेली होती. तिथेच तिची भेट गांधीनगर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका तरुणाशी भेटली. या तरुणाने पीडित मुलीला आपल्यासोबत येण्यास राजी केले. त्यानंतर आरोपी तरुणाने या मुलीवर काही दिवस बलात्कार(rape) केला.

नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर(nine standard student raped) आठ तरूणांनी सलग १३ दिवस बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.ती विद्यार्थिनी मैत्रिणीला भेटायला गेल्यानंतर एक तरुण तिला सोबत घेऊन गेला. अत्याचार केल्यानंतर त्यानं त्या विद्यार्थिनीला आपल्या ८ मित्रांच्या हवाली केले.  छत्तीसगढमधील बलरामपूर जिल्ह्यात(girl raped in balrampur) ही घटना घडली आहे. या घटनेतील सर्व आरोपींना अटक करण्यात आलं आहे. यातील सहा आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नववीत शिक्षण घेणारी पीडित मुलगी २० नोव्हेंबर रोजी मैत्रिणींना भेटायला जाते, असं सांगून घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर अंबिकापूर येथे ती मैत्रिणींना भेटण्यासाठी गेली होती. तिथेच तिची भेट गांधीनगर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका तरुणाशी भेटली. या तरुणाने पीडित मुलीला आपल्यासोबत येण्यास राजी केले. त्यानंतर आरोपी तरुणाने या मुलीवर काही दिवस बलात्कार केला. त्यानंतर आरोपी तरुणाने मुलीला आपल्या मित्रांच्या हवाली केलं. आठ आरोपींकडून त्यानंतर काही दिवस या मुलीवर सातत्यानं बलात्कार करण्यात आला. त्यामुळे ती बेशुद्ध पडली.

मुलगी बेपत्ता झाल्यामुळे तिच्या घरातील लोक चिंतेत पडले होते. कुटुंबीयांनी मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली.  त्यांनी २० नोव्हेंबरला राजापूर पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत मुलीचा शोध घेण्यास सुरूवात केली. मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून काही पथके तयार करण्यात आली होती.

पोलिसांनी ५ डिसेंबरला अंबिकापुर जिल्ह्यातील सरगुजा येथून पीडित मुलीला शोधून काढले. त्यानंतर पोलिसांनी या मुलीचा जबाब नोंदवून घेतला. आपल्यावर १३ दिवसांत आठ जणांनी बलात्कार केल्याचे मुलीने पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसही हादरले. पोलिसांनी तातडीने सर्व आरोपांनी ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आठ आरोपींपैकी सहाजण अल्पवयीन आहेत. सर्व आरोपींवर अपहरण, बलात्कार आणि पॉस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दोन सज्ञान आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांच्यावर पुढील कारवाई सुरु आहे.