पंढरपूर पोटनिवडणूक – ‘आघाडीतले मंत्री प्रचारासाठी गल्लोगल्ली फिरले पण लोकांनी त्यांना नाकारले’, नितेश राणेंनी केली टीका

पंढरपूरमध्ये भाजपाने बाजी मारली आहे.समाधान अवताडेे विजयी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर  भाजपा आमदार नितेश राणे(nitesh rane) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

    देशातील ५ राज्यांच्या निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातही पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक (Pandharpur Election 2021) निकालामुळे जोरदार चर्चा सुरू आहे. या ठिकाणी भाजपाचे समाधान अवताडे आणि महाविकास आघाडीचे भगीरथ भालके यांच्यात लढत होती. पंढरपूरमध्ये भाजपाने बाजी मारली आहे.समाधान अवताडेे विजयी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर  भाजपा आमदार नितेश राणे(nitesh rane) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

    नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “पंढरपूर पोट निवडणुकीमधे महाविकास आघाडीचे मंत्री आणि उपमुख्यमंत्रीपर्यंत सगळे गल्ली गल्ली फिरले.. तरीही लोकानी नाकारले.. महाविकास आघाडीमधल्या आमदारांना हा संदेश आहे..येणारा धोका समजा आणि एक पाऊल पुढे टाका.. भाजपा हा एकच पर्याय आहे..महाराष्ट्राची जनता आमच्या बरोबर आहे!!”