दुय्यम निबंधक कार्यालयात मध्यस्त आणि दलालांना नो एन्ट्री

पेण : पेणमध्ये महसूल विभागाचे नोंदणी व मुद्रांक नोंदणीचे दुय्यम निबंधक श्रेणी -१ चे कार्यालयात कार्यरत असुन या कार्यालयात तीन वर्ष पुर्णवेळ अधिकारी नसल्याने लिपीक वर्गीयांकडे पदभार देऊन कामकाज चालायचे. त्यामुळे दलालाचे चांगभले होते . मनमानी कारभार, बेशिस्तपणा त्यामुळे कार्यालयात आजवर दलालांचा सुळसुळाट होता. पुर्णवेळ नुतन अधिकारी संजय घोडजकर हे रुजू झाल्यानंतर दलालांना या कार्यालय परीसरात अक्षरश: नो इन्ट्री केली आहे . या कामाच्या पद्धतीमुळे जनतेतध्ये समाधान आहे.

शासकीय कार्यालयात आणि परिसरात बेजबाबदार व्यक्तींचा सुळसुळाट असे सूत्र जनतेच्या मनात बिंबले होते . पेण शहरात एक अधिकारी एक कार्यालय तालुका सुधारु शकतो. याचा प्रत्यय दुय्यम निबंधक कार्यालयात पाहील्यानंतर येतो. घोडजकर हे काही दिवसांपुर्वी रुजू झाले. त्यांनी प्रथम कार्यालयात स्वच्छता, पारदर्शकता, अभिलेख नीटनेटके लावणे यावर भर देत दलालामार्फत होणारी जनतेची पिळवणुक लक्षात घेऊन दलालाना प्रवेश बंद केल्याने दलालाचे पोटसुळ उठून सदर अधिकाऱ्याच्या विरुध्द निनावी खोट्या तक्रारी करुण कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदनामी करण्याचे दिसुन येते.

नोंदणीसाठी प्रथम येणाऱ्या पक्षकारांन , भारतीय सेनेतील आजी माजी सैनिकांना, ज्येष्ठ नागरीक यांना प्रथम प्राधान्य देऊन तात्काळ कामाचा निपटारा केला जात आहे . कार्यालयात येणाऱ्या पक्षकारांना घोडजकर यांनी मार्गदर्शन करुन तात्काळ काम कसे करता येईल, याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. त्यामुळे संजय घोडजकर यांनी पेण तालुक्यात कर्तव्यदक्ष अधिकरी म्हणुन ओळख निर्माण केली आहे.