आई – बाबा तुम्ही घरीच थांबा, उगाच करु नका गर्दीने खोळंबा – दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्राबाहेर पालकांना No Entry

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांना शुभेच्छा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर(parents not allowed on examination centre) येण्यास तसेच त्यांना परीक्षा केंद्राबाहेर फार काळ थांबण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता परीक्षा केंद्रावर येणाऱ्या पालकांना परीक्षा केंद्राबाहेर थांबता येणार नसल्याची माहिती राज्य मंडळाने दिली आहे.

    मुंबई: दहावी, बारावीच्या(tenth and twelfth exam) परीक्षेवेळी अनेक पालक आपल्या पाल्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी तसेच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जात असतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांना शुभेच्छा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर येण्यास तसेच त्यांना परीक्षा केंद्राबाहेर फार काळ थांबण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता परीक्षा केंद्रावर येणाऱ्या पालकांना परीक्षा केंद्राबाहेर थांबता येणार नसल्याची माहिती राज्य मंडळाने दिली आहे.

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत एप्रिल-मे महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.पेपर सुरु होण्याअगोदर केंद्रावरील वाढती गर्दी लक्षात घेवून राज्य मंडळाने कडक उपाययोजनाही जारी केल्या आहेत. त्यानुसार परीक्षा केंद्राबाहेर पालकांच्या वाढत्या गर्दीला रोखण्यासाठी केंद्रावर पालकांना येण्यास मनाई केली आहे. त्याचप्रमाणे प्रात्यक्षिकांवर आधारित विशिष्ट लेखनकार्य प्रकल्प, प्रात्यक्षिक वही व गृहपाठ यासंदर्भात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाताना पालकांना परीक्षा केंद्रावर मज्जाव करण्याच्या सूचना मंडळाने दिल्या आहेत. तसेच शाळांना स्वच्छता आणि सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. प्रात्यक्षिकांवर आधारित कार्य लेखी परीक्षेनंतर दिनांक २१ मे ते १० जून या कालावधीत द्यावे लागणार आहे.