चिंता मिटली – आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणार ऑक्सिजनचा व्यवस्थित पुरवठा, अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांनी नियोजनाबाबत दिली ‘ही’ माहिती

अन्न व औषध प्रशासन व शासनाव्दारे यासाठी नेमलेल्या समन्वय अधिकारी  (नोडल अधिकारी) राज्यातील सर्व जिल्ह्यांना वेळेत ऑक्सिजन पुरवठा(Oxygen Supply) होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे(rajendra shingne) यांनी दिली आहे.

    मुंबई :राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा(Oxygen Supply in State) समप्रमाणात होण्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषधमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे(Rajendra shingne) यांनी दिली.

    महाराष्ट्रात उत्पादित होणारा आणि इतर राज्यातून प्राप्त होणारा ऑक्सिजन राज्यातील जिल्ह्यांना सुरळीत आणि आवश्यकतेनुसार प्राप्त व्हावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाद्वारे (एफडीए) राज्यातील ऑक्सिजन उत्पादकांना त्यांनी दररोज कोणत्या जिल्ह्यात किती ऑक्सिजन पुरवावा यासाठी पुरवठ्याबाबतचे विवरणपत्र तयार करून ते उत्पादकांना दिले आहे.

    एफडीएमार्फत उत्पादकांना १६९५ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची सूचना विवरणपत्रातून दिल्या आहेत. ३० एप्रिलला १६०८ टन द्रवरूप वैद्यकीय वापराच्या ऑक्सिजनचा पुरवठा राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये करण्यात आला. तर २९ एप्रिलला १६७४ टन ऑक्सिजनच्या वितरणाबाबतची माहिती उत्पादकांनी प्रस्तावित वितरण पत्रावरून दिली आहे.

    अन्न व औषध प्रशासन व शासनाव्दारे यासाठी नेमलेल्या समन्वय अधिकारी  (नोडल अधिकारी) राज्यातील सर्व जिल्ह्यांना वेळेत ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.