एनआरसी समर्थनार्थ मोर्चा काढल्याबद्दल अटक केलेल्यांना न्यायालयात जमीन 

भिवंडी : मागील वर्षी देशभर नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थातच एनआरसी व सीएए विरोधात मोठ्या प्रमाणावर जनक्षोभ उसळत असताना या कायद्याच्या समर्थनार्थ अनेक संघटना पुढे आल्या त्यातूनच भिवंडी शहरात संविधान सन्मान मंच स्थापन करून २७ डिसेंबर रोजी भिवंडी शहरात मंडई ते शिवाजी चौक या दरम्यान समर्थनार्थ विशाल मोर्चा काढला होता. या दरम्यान शासनाने कायदा सुव्यस्थेच्या संदर्भात संभाव्य धोका लक्षात घेत या काळात समर्थानात अथवा विरोधात मोर्चा निदर्शन करण्यास परवानगी नाकारली असताना हा मोर्चा आयोजित केल्यामुळे शहर पोलीस ठाण्यात या मोर्चाचे  आयोजक संदीप भगत ,जयानंद केणी ,विशाल पाठारे ,अनिल केसरवाणी ,कल्पना शर्मा ,ममता परमाणी यांच्या विरोधात भादवी कलम १८८ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (३), १३५ नुसार गुन्हा दाखल केला होता .

सोमवारी या गुन्ह्यातील सर्व आयोजकांना ताब्यात घेत त्यांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने ७५०० रुपयांच्या वैयक्तिक हमी वर जमीन मंजूर करण्यात आला आहे . या सर्वांची बाजू जेष्ठ वकील भाजपाचे पदाधिकारी अॅड हर्षल पाटील यांनी विना मोबदला मांडली .