दिलासादायक बाब – राज्यात गेल्या २४ तासांमध्ये नव्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या जास्त, जाणून घ्या आजची आकडेवारी

राज्यात दिवसभरात ४८,६२१ नव्या कोरोना रुग्णांची(Corona Patients in Maharashtra) नोंद झाली आहे. तसेच आज दिवसभरात ५९,५०० रुग्ण कोरोनातून  बरे झाले आहेत.

    कोरोना रुग्णांची (Corona Update) संख्या झपाट्याने वाढत आहे.मात्र आज एक दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांमध्ये नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यात दिवसभरात ४८,६२१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आज दिवसभरात ५९,५०० रुग्ण कोरोनातून  बरे झाले आहेत. कोरोनामुळे राज्यामध्ये ५६७ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ७०, ८५१ वर पोहोचली आहे.

    राज्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ८४.७ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच मृत्यूदर १.४९ इतका आहे. २,७८,६४,४२६ प्रयोगशाळेतील नमुन्यांपैकी ४७,७१,०२२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या ३९,०८,४९१ रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत.२८,५९३ संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.राज्यात सध्या ६,५६,८७० सक्रीय रुग्ण आहेत.

    मुंबईत दिवसभरात २६२४ नवे रुग्ण
    दरम्यान मुंबईत दिवसभरात २६२४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आत्तापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ६५८६२१ एवढी झाली आहे. तर ७८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आत्तापर्यंत १३३७२ मृत्यूची नोंद करण्यात आली.