corona test

दिल्ली, उत्तर प्रदेश आणि गुजरातनंतर ओडिशानेही आपल्या कोरोना चाचणीच्या किमतीमध्ये कपात केली आहे. ओडिशामध्ये कोरोना चाचणी (RT-PCR test) फक्त ४०० रुपयांमध्ये(corona test in 400 rupees) होणार आहे.

विविध राज्यांमध्ये कोरोना चाचणीच्या दरांमध्ये कपात करण्यात आली आहे.  दिल्ली, उत्तर प्रदेश आणि गुजरातनंतर ओडिशानेही आपल्या कोरोना चाचणीच्या किमतीमध्ये कपात केली आहे. ओडिशामध्ये कोरोना चाचणी (RT-PCR test) फक्त ४०० रुपयांमध्ये(corona test in 400 rupees) होणार आहे.( odisha government is taking lowest prize for corona test in country) त्यासंदर्भात नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.

कोरोना चाचणीची किंमत आतापर्यंत २००० ते २५०० रुपये दरम्यान होती. मात्र दिल्ली सरकारने खासगी रुग्णालयातील कोरोना चाचणीचा दर ८०० रुपये केला. दिल्लीनंतर राजस्थान, उत्तर प्रदेश आणि गुजरात सरकारनेही कोरोना चाचणीच्या दरामध्ये घट केली.

ओडिशा सरकारनं या सर्वांना मागे टाकत आतापर्यंतची सर्वात स्वस्त कोरोना चाचणीची घोषणा केली आहे. ओडिशामध्ये आता कोरोनाच्या आरटी-पीसीआर चाचणीला फक्त ४०० रुपये मोजावे लागतील. यासंदर्भातील सूचना ओडिशा सरकारने सगळ्या राज्यांना दिल्या आहेत.