bathing

एका रुग्णालयाच्या महिला वसतिगृहातील बाथरुममध्ये नर्सच्या(nurse recording bathing video) आंघोळीचे व्हिडिओ (bathing video) बनवण्यात आले. आश्चर्य म्हणजे तिथली एक नर्स हे व्हिडिओ करुन आपल्या प्रियकराला पाठवत होती. 

प्रेम आंधळ असतं आणि प्रेम टिकवण्यासाठी कोण कुठल्या थराला जाईल, हे काही सांगता येत नाही, असे म्हणतात. तामिळनाडूमध्ये याचीच प्रचिती आली आहे.एका रुग्णालयाच्या महिला वसतिगृहातील बाथरुममध्ये नर्सच्या(nurse recording bathing video) आंघोळीचे व्हिडिओ (bathing video) बनवण्यात आले. आश्चर्य म्हणजे तिथली एक नर्स हे व्हिडिओ करुन आपल्या प्रियकराला पाठवत होती.

तामिळनाडूतील(tamilnadu) वेल्लोरमधून पोलिसांनी नुकेतच आरोपी प्रियकराला अटक केली. प्रियकराला व्हिडीओ पाठवणारी नर्स तेथील एका रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात काम करत होती. तिला प्रियकरासोबतचे नाते टिकवून ठेवायचे होते. त्यासााठी प्रियकर सांगेल ते सगळे करायला ती तयार होती. पाच डिसेंबरला वसतिगृहातील एका कर्मचाऱ्याला बाथरुममधील खिडकीजवळ रेकॉर्डिंगसाठी ठेवलेला मोबाईल फोन सापडल्याने हा सगळा प्रकार उजेडात आला.

हे प्रकरण उघडकीस आल्यावर त्या नर्सने गोळयांचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ती बरी झाल्यानंतर पोलिसांनी तिची चौकशी केली. त्यावेळी त्या नर्सने सांगितले की तिने केलेली दोन लग्न टिकू शकली नाही. त्यामुळे नव्याने जोडले गेलेले प्रियकरासोबतचे नाते तिला टिकवायचे होते.

एकदा तिने केलेला कॉल राँग नंबर लागला. पण समोरच्या व्यक्तीबरोबर तिची ओळख झाली. ते एकमेकांच्या प्रेमात पडले. जेव्हा प्रियकराला तिच्या फसलेल्या लग्नांबद्दल समजले, तेव्हा तो तिच्यापासून लांब राहू लागला. हे नाते टिकवण्यासाठी ती नर्स आरोपीच्या सर्व मागण्या पूर्ण करु लागली.

सुरुवातीला ती त्याला स्वत:चे व्हिडिओ पाठवायची. पण त्याला त्याचा नंतर कंटाळा येऊ लागला. त्याने तिला दुसऱ्या महिलांचे आंघोळीचे व्हिडिओ पाठवायला सांगितले. त्यानंतर ती अन्य महिला सहकाऱ्यांच्या आंघोळीचे व्हिडिओ रेकॉर्ड करुन त्याला पाठवू लागली. मात्र हे व्हिडिओ मागवण्यामागचे कारण अजून समजलेले नाही. पोलीस याबाबत तपास करत आहेत.