विळे रस्त्यालगत ट्रेलरमधील कॉइल रस्त्यावर

विळेभागाड कडे ट्रेलर घेऊन जाणाऱ्या ट्रेलर मधील कॉइल साखळी तोडून रस्त्याच्या कडेला दिनांक १९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास खाली पडली. त्यामुळे काही काळ या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती.

सुतारवाडी: विळेभागाडकडे ट्रेलर घेऊन जाणाऱ्या ट्रेलर मधील कॉइल साखळी तोडून रस्त्याच्या कडेला दिनांक १९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास खाली पडली. त्यामुळे काही काळ या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती. मात्र जेसीबीच्या सहाय्याने कॉइल पुन्हा ट्रेलर मध्ये चढविण्यात आली. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. ही कॉइल दुचाकी किंवा चारचाकी वर पडली असती तर अक्षरश: चुराडा झाला असता. सुदैवाने घटना घडली तेव्हा येथून कोणतेही वाहन जात नव्हते त्यामुळे मोठा धोका टळला. ज्यावेळी ट्रेलरमध्ये कॉइल ठेवतात तेव्हा मोठ्या साखळीने त्या व्यवस्थित बांधल्या जातात. मात्र कोलाड-सुतारवाडी मार्गे येताना किंवा विळे मार्गे जाताना अनेक नागमोडी वळण आहेत.

या नागमोडी वळणावर ट्रेलरमधील कॉइल जागेवरून पुढेमागे होत असतात. या कॉइल २५ ते ३५ टन वजनाचे असतात त्यामुळे ती ट्रेलर मधून खाली कोसळली तर मोठा अनर्थ घडतो. या कॉइल तीनही बाजूंनी बंदिस्त असलेल्या ट्रक मधून नेण्यास किंवा आणल्यास त्या खाली पडणार नाहीत की धोका उद्भवणार नाही. कोलाडपासून सुतारवाडी मार्गे नागमोडी वळणं आहेत ती अत्यंत धोकादायक अशी आहेत. या नागमोडी वळणावर दोन वर्षांपूर्वी अनेक अपघातही झाले आहेत. तसेच वळणावर ट्रेलर पलटी होण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. ट्रेलर मधून कॉइल नेताना काळजीपूर्वक ती बंदिस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच रिकामा किंवा कॉइलने भरलेल्या ट्रेलरच्या चालकाचे वाहन चालविताना नियंत्रण असावे. सुसाट वेगाने ट्रेलर चालवू नये अशी मागणी या ठिकाणच्या रहिवाशांकडून जोर धरत आहे.