टिटवाळ्यात एक दिवसाचे बाळ धर्मशाळेच्या मागे टाकून माता फरार

कल्याण : टिटवाळ्यात  नवजात अर्भकाला त्याच्या आईने धर्मशाळेच्या मागे टाकून दिल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर टिटवाळा पोलीस या संदर्भात त्या आईचा शोध घेत आहे.

एक दिवसाचे मूल परित्याग करण्याच्या हेतूने  टिटवाळा पूर्व येथील गणेशचाळ धर्मशाळेच्या मागील बाजूस टाकुन मुलाची आई गेली असावी. याबाबत टिटवाळा पोलीसांनी गुन्हा गुरुवारी दाखल केला आहे. या अनोळखी आईबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी टिटवाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांना ९८२३०५५३६९ या नंबरवर किंवा सचिन गायकवाड यांना ९९८७३३४०७ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.