sushant-rhea

मुंबई: आज सलग दुसऱ्या दिवशी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली. याच काळात एजन्सीकडून अंजू केशवानी नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. कैजन इब्राहीमची चौकशी करताना केशवानीचे नाव समोर आले होते.

एनसीबीने रविवारी केशवानींच्या जागांवर छापेमारी केली. त्यावेळी तिशे हशीश, एलएसडी, मारिजुआना आणि काही पैसेही सापडले. आतापर्यंत या प्रकरणात एनसीबीने ९ जणांना अटक केली आहे. यापैकी ७ जणांचा या प्रकरणाशी थेट संबंध आहे आणि दोघांना चौकशी झाल्यानंतर अटक करण्यात आली आहे.रिया चक्रवर्तीच्या ड्रग कनेक्शनबाबत सखोल चौकशी सुरु आहे. त्यातून अनेक नावे पुढे येत आहेत.