mamata banerjee

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक(west bengal) हळूहळू जवळ येत असताना तृणमूल काँग्रेसला(trunmul congress) गळती लागली आहे. सुवेंदू अधिकारी यांच्यानंतर तृणमूलच्या आणखी एका आमदाराने पक्षाचा राजीनामा(mla resignation) दिला आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक(west bengal) हळूहळू जवळ येत असताना तृणमूल काँग्रेसला(trunmul congress) गळती लागली आहे. सुवेंदू अधिकारी यांच्यानंतर तृणमूलच्या आणखी एका आमदाराने पक्षाचा राजीनामा(mla resignation) दिला आहे. गेल्या दोन दिवसांत तीन नेत्यांनी तृणमूल काँग्रेस सोडल्याने ममतांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याच्या धक्क्यातून सावरण्याआधी जितेंद्र तिवारी यांनीही तृणमूलला रामराम केला. दोन नेत्यांच्या राजीनाम्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये खळबळ उडालेली असतानाच तृणमूलच्या आणखी एका नेत्याने राजीनामा दिला आहे. आमदार शीलभद्र दत्त यांनी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला. शीलभद्र दत्त यांच्याबरोबर तृणमूलचे नेते कबिरूल इस्लाम यांनी पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलच्या महासचिव पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे तेही लवकरच तृणमूल सोडणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.