Balasaheb-Thorat

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात(balasaheb thorat) यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या रॉयल स्टोन बंगल्यात (royal stone bunglow)एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न(suicide at balasaheb thorat`s bunglow) केला आहे.

    मुंबई. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात(balasaheb thorat) यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या रॉयल स्टोन बंगल्यात (royal stone bunglow)एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न(suicide at balasaheb thorat`s bunglow) केला आहे. विशेष कार्यकारी अधिकारी दालनात एका व्यक्तीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच या व्यक्तीला अडवले आणि मोठा अनर्थ टळला. पांडुरंग वाघ असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

    पांडुरंग वाघ हे अहमदनगर नेवासा येथील झापडी गावाचे रहिवाशी आहेत. वाघ यांनी शासनाकडून २०१८ मध्ये वाळू उत्खनन व वाहतुकीचा परवाना मिळवला होता. त्यासाठी त्यांनी शासनास ८ लाख ७२ हजार भरले होते आणि वाघ यांनी वाळू उत्खनन काम सुरू केले. मात्र, स्थानिकांच्या विरोधामुळे वाळू उपसा झाला नाही. गावकऱ्यांच्या वारंवार विरोधामुळे वाघ यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. वाघ यांनी स्थानिकांना समजावण्याचा प्रयत्न केला, काम सुरू करण्यासाठी अटी शर्तीचे प्रयत्न केले मात्र त्यात त्यांना काही यश आले नाही. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून पांडुरंग वाघ यांनी पुन्हा शासनाचे दार ठोठावले आणि आपले शासनाकडे भरलेले पैसे परत मिळावे म्हणून यांनी पाठपुरावा सुरू केला होता.

    वाघ यांनी भरलेले ८ लाख ७२ हजार रुपये त्यांना लवकर परत मिळावे म्हणून त्यांनी मंगळवारी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या रॉयल स्टोनच्या विशेष कार्यकारी अधिकारी दालनात स्वतःवर पेट्रोल टाकून जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र योग्य वेळी पोलीसांनी वाघ यांना अडवलं आणि आत्महत्या करण्यापासून रोखलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी वाघ यांना सीआरपीसी ४१ (१) अंतर्गत अटक करत त्यांची जामिनावर सुटका केली. तसेच या पुढे असं पाऊल न उचलण्यासाठी समज सुद्धा पोलिसांनी वाघ यांना दिली.