गडचिरोली जिह्यात नक्षल्यांचा भ्याड हल्ला, एक जवान शहीद

अहेरी. भामरागड उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या कोठी पोलिस मदत केंद्रातील पोलिस जवानांवर नक्षल्यांनी हल्ला केल्याची मोठी घटना नुकतीच घडली आहे. या हल्ल्यात एक पोलीस जवान शहीद झाला आहे. तर एक गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे दुशांत नंदेश्वर असे शाहिद जवानांचे नाव असून दिनेश भोसले हे या हल्ल्यात गंभीर जखमी आहे. यापॆकी सुशांत नंदेश्वर हे घटनास्थळीच शाहिद झाले तर दिनेश भोसले गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी नेण्यात आले आहे.   प्राप्त माहितीनुसार दोन्ही जवान कोठी गावात किराणा सामान आणण्यासाठी गेले होते. दरम्यान नक्षल्यांनी दोन्ही जवानांवर हल्ला केला. नक्षल्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यामध्ये  एक जवान शहीद झाला आहे आहे.