Sanjay Raut

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे(5 states election result) निकाल आज लागणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या निवडणुकांबाबत भाकित वर्तवलं आहे.

    मुंबई : पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे(5 states election result) निकाल आज लागणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या निवडणुकांबाबत भाकित वर्तवलं आहे.

    “ तामिळनाडू आणि पाँडिचेरी सोडून कुठेही सत्ता परिवर्तन होणार नाही. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच सरकार बनवेल. केरळमध्येही सत्ता परिवर्तन होणार नाही. नंदीग्रामबाबत चर्चा काहीही होऊ देत, पण ममतादीदींचं धैर्य मानायलाच हवं. त्या दोन जागांवर लढल्या नाहीत. त्या एकाच जागेवर लढल्या. त्यांनी आव्हान स्वीकारलं. पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींना हरवणं सोपं नाही. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचंच सरकार येणार,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

    दरम्यान यावेळी संजय राऊत यांनी भाजपाचे आकडे वाढतील असं सांगितलं आहे.

    संजय राऊत म्हणाले,“भाजपानं केलेल्या व्यवस्थापनाचं कौतुक केलंच पाहिजे.  देशाचे पंतप्रधान कोरोनाच्या संकटकाळातदेखील तिथे तंबू ठोकून बसले. राज्याराज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नेऊन बसवले. पण पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना हरवणं इतकं सोपं नाही. बहुमताचा आकडा कमी होईल कदाचित त्यांचा. पण निकाल हाती येतील, तेव्हा तृणमूल काँग्रेसचंच सरकार तिथे आलेलं असेल. भाजपाचे आकडे नक्कीच वाढत आहेत. लोकसभेतही वाढले आहेत. त्यांची मेहनतही आहे, गुंतवणूकही आहे, सगळंच आहे”.

    ते पुढे म्हणाले,“निवडणुकीचं हे वातावरण दुपारपर्यंत संपून जाईल. देशभरात आजही सर्वात मोठं संकट हे कोरोनाचं आहे. देशात कुणीही कोरोनाच्या संकटात निवडणुकीवर लक्ष देत नाहीये. आम्हाला चिंता कुणाच्या राजकीय आकड्यांच्या वाढीपेक्षा कोरोनाच्या वाढीची आहे.. देशात ४ लाखांच्या वर कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. हजारो रुग्ण मरत आहेत. ऑक्सिजन, बेड नाहीत. हे कशामुळे होतंय याचं चिंतन करण्याची गरज आहे”.