on the threshold of mim footpath in solapur

बंगालमध्ये निवडणुका(west bengal election) लढविण्याची घोषणा केल्यानंतर एआयएमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi)लवकरच कोलकातात दाखल होणार आहेत.

कोलकाता: बंगालमध्ये निवडणुका(west bengal election) लढविण्याची घोषणा केल्यानंतर एआयएमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi)लवकरच कोलकातात दाखल होणार आहेत. या दौऱ्यापूर्वी ओवेसींनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची चर्चा केली. या चर्चेत २७ टक्के मुस्लीम लोकसंख्या असलेल्या बंगालमध्ये पक्षाचा विस्तार करण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते. बैठकीत सहभागी झालेल्या नेत्यांनी ओवेसी लवकरच बंगालमध्ये एका सभेला संबोधित करतील आणि निवडणुकीचा बिगूल फुंकतील अशी माहिती दिली.  बंगाल विधानसभा निवडणुकीला सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला असून रणनीतीलाही वेग आला आहे.

९० जागा लढविण्याची तयारी
बंगालमध्ये प्रथमच निवडणुका लढविण्यास तयार असलेला एआयएमआयएम महत्त्वाच्या जागांवर फोकस करणार आहे. तथापि एआयएमआयएम मुस्लिमांचे प्राबल्य असलेल्या मुर्शीदाबाद, मालदा, उत्तर दिनाजपूर आणि काही अन्य जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. राजकीय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, २९४ विधानसभा मतदारसंघ असलेल्या बंगालमध्ये १२० जागांवरील निकाल फिरविण्याची क्षमता मुस्लीमांमध्ये आहे. त्यामुळेच एआयएमआयएम राज्यातील ९० जागा लढविण्याच्या तयारीत आहे.

सीएए-एनआरसी मुद्यावर करणार एकजूट
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, बंगालमध्ये झालेल्या सीएए व एनआरसी विरोधी आंदोलनात एआयएमआयएमचा सक्रिय सहभाग होता. पक्षाचे राज्यात अनेक गट असून त्यांची सर्व प्रथम एकजूट केली जाणारर आहे अशी माहिती एका नेत्याने दिली. हैदराबादमध्ये झालेल्या बैठकीत बंगालमधील सर्व २३ जिल्ह्यांचे नेते सहभागी होते.